मराठी पाककृती

पाककृती: बेगम बहार फोटो: मायबोलीकर दिनेश शिंदे

पाककृती: बेगम बहार फोटो: मायबोलीकर दिनेश शिंदे

मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल कितीही लिहलं तरी अपुरंच. किंवा कितिही लिहलं तरी पोट भरणार नाही. :)

पण तुम्हाला मराठी पाककृती शोधायच्या असतील तर सगळ्या जुन्या आणि लोकप्रिय मायबोलीच्या आहारशास्त्र आणि पाककृती विभागाला नक्की भेट द्या. सगळ्या प्रकारच्या पाककृती सापड्तीलच पण एखादी तिथे नसली तर मायबोलीकर आपुलकीनं मदतंही करतील.  “व्यासोच्छीष्टंम जगत सर्वम” म्हटलं आहे त्यात थोडा बदल करून म्हणतो ” मायबोलीच्छीष्टंम जगत सर्वम:.
या विभागात काय नाही आहे?
आहाराप्रमाणे  पाककृती आहेत: शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन.  प्रकाराप्रमाणे पाककृती आहे. आमटी, कढी, पिठल्यापासून वाळवण साठवण सर्व आहे.  उपवासाचे पदार्थ आहेत. पारंपारीक भारतीय, मराठी आहेच पण इटालियन आणि चायनि़ज सारख्या आंतराष्ट्रीय रेसिपीज सुद्धा आहेत.   इतक्या सगळ्या रेसीपीज मधून कुठली निवडावी असा प्रश्न साहजिकच पडेल. पण त्याच विभागात “बेत काय करावा” याचा सल्ला देणाराही लेखनाचा धागा आहे.
ऑनलाईन लेखन तर कधीही पाहता येतंच. पण स्वतःजवळ पुस्तक ठेवायचं असेल तर मायबोलीच्या खरेदी विभागातून पाककृतींची पुस्तके विकत घ्यायचीही सोय आहे.

तुम्हाला जर वाटत असेल मराठी पाककृतींचा तुमचा अगदी दांडगा अभ्यास आहेत तर तेही तपासून पाह्यला तुम्ही या विभागाला भेट द्यायला हवीच. हयग्रीव, चिकौले, रंगीनी, दोदोल, सखुबत्ता  अशा अनवट नावांचे पदार्थ कदाचित तुम्ही ऐकले नसतील.

वर फोटोत असलेली बेगमबहार पाककृती या ठिकाणी पाहता येईल.

गेली काही वर्षे मायबोलीवरच्या ऑनलाईन गणेशोत्सवात पाककृतींची स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतल्या प्रवेशिका आणि विजेते पदार्थही तुम्हाला या विभागात सापडतील. इतकंच नाही तर ज्या मायबोलीकरांनी हे प्रत्यक्ष करून पाहिले त्यांचंही हितगुज वाचायला मिळेल.